अभ्यासाची गुरुकिल्ली भाग: १
प्रिय,पालक व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार.
सर्वप्रथम मी स्वतचा परिचय देते मी सौ संध्या उपेंद्र जोशी मी एक निवृत्त शिक्षिका आहे व मला विविध वर्गातील व विषयातील मुला मुलीना शिकवण्याचा ३० वर्षांचा अनुभव आहे तसेच मी समुपदेशक व education counsellor म्हणून सध्या काम करते आहे.
सध्याच्या कोरोना महामारीमुळे मुलांचे शिक्षण व अभ्यास हा जरी ऑनलाइन सुरु असला तरी अभ्यासात येणाऱ्या समस्या त्याच आहेत. शालेय मुला मुलीना येणाऱ्या अडचणी जश्या कि अभ्यासात लक्ष न लागणे,थकवा जाणवणे,अभ्यासाचा कंटाळा येणे,केलेला अभ्यास लक्षात न राहणे,टिव्ही व मोबाईल मधे गेम खेळणे व रमणे इत्यादी. या सर्व बाबींसाठी मी इथे क्रमाक्रमाने थोडक्यात माहिती देणारे लेख लिहणार आहे.तर आज आपण यशस्वी भव या संकल्पने अंतर्गत अभ्यासात यश कसे मिळवावे हे पाहणार आहोत.
सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवा.आपल्या मनात हे वाक्य वारंवार म्हणा कि me प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्यामुळे मला यश नक्की मिळणार आहे. आपली निरीक्षण शक्ती उत्तम ठेवावी म्हणजे अभ्यास कळीपुर्वक करताना प्रश्न व त्याचे नेमके उत्तर माहित ठेवावे.
श्रवणकौशल्य म्हणजे कि वर्गात,किवा ऑनलाइन कोचिंग क्लासेस मध्ये निट लक्ष देऊन ऐकावे.
वाचनकौशल्य: वर्गात किवा क्लासेस मध्ये शिकवण्यात येणारा टॉपिक आधी आपण स्वतः वाचल्यास तो अधिक उत्तम रित्या कळतो. लेखनकौशल्य:लिखाणाने गती वाढते,अक्षर निटनेटके होते,पेपर वेळेत पूर्ण होण्यासाठी परीक्षेचा सराव होतो आणि लिहून पाहिलेले परीक्षेच्या वेळी लवकर आठवते. स्वतःच्या थोडक्यात नोटस काढाव्या व परीक्षेच्या आधी उजळणी म्हणून त्या वाचाव्या म्हणजे वेळ पण वाचतो व उजळणी छान होते व परीक्षेचा ताण येत नाही व परीक्षेआधी स्वतःबद्दल चा आत्मविश्वास वाढतो.
मन:शांती साठी ध्यान धारणा करावी व नियीमित पणे ओमकार जप करावा त्यामुळे मन शांत राहते,एकाग्रता वाढते व वाचलेला अभ्यास लक्षात राहतो. एकाग्रता व ध्यानधारणा या विषयावर पुढील लेखात सांगेलच.
काळजी घ्या अभ्यास करा व आनंदी राहा आणि ऑल द बेस्ट..!!
वैयक्तिक अभ्यासाबद्दलच्या प्रत्येक्ष किवा ऑनलाइन समुपदेशन घेण्यासाठी किवा अधिक माहिती साठी आपण मला माझ्या मोबाईल नंबर वर संपर्क करू शकता.
क्रमक्ष:
सौ संध्या उपेंद्र जोशी[वरिष्ठ समुपदेशक]
९४२२२९६०९४