व्यक्तिमत्त्व विकास

एखाद्या बालकाचे व्यक्तिमत्त्व घडवताना त्याच्यामध्ये काही गुणविशेष जोपासण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो. उदा. निर्णयक्षमता, आरोग्य,सादरीकरण संवाद कौशल्य, आत्मविश्वास, साकारात्मता.

जवाबदारीची जाणीव देणे हे एक प्रकाच प्रशिक्षण मानलं जाते. आपल्याला अनेक गोष्टी चांगल्या जमतात या भावनेचा उपयोग यशस्वी होण्यासाठी मोठेपणीही होतो. लहानपणापासून छोटे मोठे निर्णय घेणे याची सवय लावल्यास मानसिक तणाव काळजी इतादींचा त्रास होत नाही. आत्मप्रतिमा जोपासली जाते. जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक अशी कर्तव्याची जाणीव निर्माण होते.

मुलाच्या व्यक्तिमत्त्वच रोपटं हे कौतुक आणि प्रोत्साहनाची खतावरच सर्वांगीण वाढत. परिपूर्ण कोणीच नाही जे नाही त्यापेक्षा जे आहे त्याचा सर्जनशील विचार करणे हे आवश्यक आहे. जे आवडते ते मिळवण्यासाठी जरूर प्रयत्न करा. पण जे मिळालं त्याबद्धल उपकृत राहा. मुलांना नुसतंच प्रेम नको असते. आदर, गौरव, सन्मान हि भावनाही हवी असते. ह्या भावना ज्या मुलांना मिळतात तीच मूळ स्वतःचा योग्य आणि लायक व्यक्ती म्हणून स्वीकार करू शकतात. आणि प्रौढपणी यशस्वी, सुखी बनू शकतात.